ऑनलाईन अर्ज भरण्याची योग्य पद्धत

 

टप्पा अ

 

संकेत स्थळ
उमेदवाराने सर्वप्रथम  संकेत स्थळावर जाउन ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत या बटनावर क्लिक करावे व ऑनलाईन अर्ज भरण्याची योग्य पद्धत नीट समजून घ्यावी.

 

ऑनलाईन अर्ज
या नंतर जाहिरातीचा सर्व मजकूर काळजीपुर्वक वाचल्यानंतर स्वतः पात्र होत असलेल्या पद/जागा यासाठी अर्ज करण्याकरीता ऑनलाइन अर्ज या बटनावर क्लिक करावे.

 

महत्वाच्या सूचना
येणा-या सुचना फलका प्रमाणे तयारी करुन         या बटनावर क्लिक करावे.

 

सूचना
यानंतर येणारा फलक वाचून         या बटनावर क्लिक करुन सुचना मान्य असल्याचे नमूद करावे.

 

रजिस्ट्रेशन / लॉग इन
उमेदवाराला ऑनलाईन अर्ज भरण्यापुर्वी रजिस्ट्रेशन करावे लागेल त्या करीता रजिस्ट्रेशन या लिंकवर क्लिक करा.

 

रजिस्ट्रेशन
उमेदवाराचे रजिस्ट्रेशन करण्याकरीता आवश्यक सर्व वैयक्तीक माहीती योग्य रकान्यात भरावी.
उमेदवाराने येथे भरावयाची माहिती, पद निवड  योग्य व अचूक भरावी. येथील माहितीच मुख्य अर्जात दिसेल व
या माहितीत नंतर कोणताही बदल करता येणार नाही.
माहिती योग्य भरल्याची खात्री करुन          या बटनावर क्लिक करा.

 

उमेदवाराने काही रकाने अपुर्ण अथवा अयोग्य पद्धतीने भरल्याचा त्रुटी संदेश आल्यास आवश्यक तो बदल करुनच पुढील पानावर जाता येइल.

 

 

लॉग इन आयडी व पासवर्ड
उमेदवाराने भरलेला ईमेल आयडी आधीच वापरलेला असल्याबद्दलचा त्रुटी संदेश आल्यास उमेदवाराला अन्य ईमेल आयडी वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्या करीता     या बटनावर क्लिक करा व पुन्हा प्रयत्न करा.

 

उमेदवाराने भरलेली माहिती समाधानकारक असल्यास त्याचे रजिस्ट्रेशन होउन त्याला मिळालेला लॉग इन आयडी व पासवर्ड दिसेल. या माहितीची प्रिंट पुढील उपयोगा करीता काढुन ठेवा. उमेदवाराने पुढील प्रक्रिये करीता त्याची नोंद स्वतः जवळ जतन करुन ठेवणे आवश्यक आहे.

 

 

ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरक्षा सांकेतांक
नंतर येणा-या फलकावरील चार अक्षरी सुरक्षा सांकेतांक अचूकपणे रिकाम्या चौकटीत टाकावा व     या बटनावर क्लिक करावे.

 

सुरक्षा सांकेतांक चुकल्याचा फलक आल्यास पुन्हा अचूक सुरक्षा सांकेतांक रिकाम्या चौकटीत टाकावा व         या बटनावर क्लिक केल्यावर प्रत्यक्ष अर्ज भरता येईल.

 

अर्जदाराची स्वतःची संपुर्ण माहिती, फोटो अपलोड, अर्ज सबमिट व चलान प्रिंट करणे.
रिकाम्या रकान्यात योग्य माहिती भरुन अर्ज पुर्ण करावा. या मध्ये खाली दिलेल्या क्रमाने अर्ज भरावा.
उमेदवाराने रजिस्ट्रेशन करतेवेळी भरलेली माहिती त्या त्या रकान्यात दिसेल परंतु त्यात आता बदल करता येणार नाही. उर्वरीत सर्व माहिती संपुर्ण व अचूक भरावी.

 

 

या मध्ये वैयक्तीक माहीती
सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षण या संबंधी माहीती.
शैक्षणिक अर्हता व पदा सबंधी अनिवार्य शैक्षणिक अर्हता
पदा सबंधी अनुभव व सेवायोजन कार्यालयातील नोंदणीचा तपशील.
महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र

अर्जातील माहितीच्या सत्यते बद्दलचे प्रतिज्ञापत्र

माहीती भरल्यानंतर               या बटनावर क्लिक करावे.

 

पदा सबंधी अनिवार्य शैक्षणिक अर्हते संबंधी विचारलेल्या प्रश्नांना उमेदवारांनी दिलेल्या उत्तरानुसार त्या त्या शैक्षणिक अर्हतेच्या रकान्यात चित्रात दाखवल्या प्रमाणे ‘टिक’ केलेले दिसेल. सदर माहीती संपुर्णरित्या भरल्याशिवाय अर्ज सबमीट करता येणार नाही.

 

इतर शैक्षणिक अर्हता व माहीती भरण्याकरीता त्या त्या शैक्षणिक अर्हतेच्या रकान्यात चित्रात दाखवल्या प्रमाणे ‘टिक’ करावे व सदर माहीती संपुर्णरित्या भरावी.

 
 

काही रकाने अपुर्ण अथवा अयोग्य पद्धतीने भरल्याचा त्रुटी संदेश आल्यास आवश्यक तो बदल करुनच पुढील पानावर जाता येईल.

 

 

अश्या पद्धतीने उमेदवाराने अर्जात विचारलेली सर्व आवश्यक माहीती अचूकपणे व संपुर्णरित्या भरावी.

 

फोटो अपलोड व स्वाक्षरी अपलोड

फोटो अपलोड या बटनावर क्लिक करावे व स्कॅन केलेले स्वतःचे अद्ययावत सुस्पष्ट 3.5 से.मी. X 4.5 से.मी. आकारातील “JPG/JPEG/BMP” या प्रकारचे व 150 KB पर्यंत फाईल साईज असलेले छायाचित्र अपलोड करावे.
(छायाचित्राचा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.)

 

छायाचित्रा (फोटो) चा फाईल प्रकार अथवा फाईल साईज अयोग्य असल्यास छायाचित्र अपलोड होणार नाही व त्या संबंधीचा त्रुटी संदेश दिसल्यास योग्य त्या प्रकारचे छायाचित्र निवडून अपलोड करावे.

 

छायाचित्र अपलोड झाल्यास, छायाचित्र अपलोड झाल्याचा संदेश दिसेल. येथे         या बटनावर क्लिक करा. म्हणजे उमेदवाराला त्याचे अपलोड झालेले छायाचित्र पाहता येईल किंवा आवश्यक असल्यास बदल करता येईल.

 

याच पद्धतीने विहीत नमुन्यातील स्वाक्षरीची इमेज अपलोड करावी.

 

सूचनाः फोटो व स्वाक्षरी त्यांच्या त्यांच्या जागीच अपलोड झाल्याची खात्री उमेदवाराने करुन घ्यावी.

 

अपलोड झालेले छायाचित्र व स्वाक्षरी योग्य तसेच्‍ योग्य ठिकाणी असल्यास        या बटनावर क्लिक करावे.

 

 

 

वैधता तपासणी

येथे तुमची माहिती योग्य असल्याचा संदेश फलक आल्यास अर्जाचा प्रिव्हयु तपासा/सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यावर उमेदवाराला त्याने भरलेल्या संपूर्ण अर्जाचा नमुना प्रिव्हयु पहावयास मिळेल.

 

तुम्ही भरलेला अर्ज अवैध असल्याचा संदेश आल्यास संबंधित माहितीची तपासणी/ आवश्यक बदल ( निवडलेले पद, उमेदवाराचे नाव, जन्म दिनांक, ईमेल आयडी यात बदल करता येणार नाही.) करावा व पुन्हा वैधता तपासणी या बटनावर क्लिक करावे.

 

तुम्ही भरलेल्या अर्जात माहिती योग्य असल्याचा संदेश आल्यास अर्ज तपासा/सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यावर उमेदवाराला त्याने भरलेल्या संपूर्ण अर्जाचा प्रिव्हयु पहावयास मिळेल. उमेदवाराने त्याच्या अर्जातील सर्व माहिती प्रिव्हयु मध्ये काळजीपुर्वक तपासावी.
हा प्रिव्हयु केवळ अर्ज तपासणी करीता आहे.

 

 

उमेदवाराला अर्जाचा प्रिव्हयु तपासल्यावर काही बदल आवश्यक वाटल्यास   या बटनावर क्लिक करुन व नंतर त्या माहिती संबंधित बटनावर क्लिक करुन योग्य तो बदल करु शकेल. व पुन्हा अर्जाची वैधता तपासणी करावी लागेल. व प्रिव्हयु तपासावा लागेल.

 

 

अर्ज सबमिट करण्यास उमेदवाराची संमती
उमेदवाराची, अर्ज परीपुर्ण असल्याची खात्री झाल्यावर व प्रतिज्ञापत्र मान्य करण्याकरीता     या बटनावर क्लिक करुन अर्ज सबमिट (जमा) करावा. एकदा अर्ज सबमिट (Submit) केल्यावर कोणत्याही प्रकारचे बदल अथवा नव्याने माहिती भरता येणार नाही.

उमेदवाराने अर्ज सबमिट केल्यावर अर्ज जमा (सबमिट) झाल्यासंबंधी संदेश फलक येईल. त्यानंतर          या बटनावर क्लिक करावे.

 

परीक्षा शुल्काचे चलान प्रिंट करा  व परीक्षा शुल्क भरा.

महत्वाची सूचना – अर्ज सबमीट केल्यानंतर चलानवर दिलेल्या सूचनेनूसार बँकेत चलानद्वारे पैसे भरता येतील. (बॅंकेचे सुटीचे दिवस वगळून परंतू चलान बँकेत भरण्याच्या अंतिम दिनांका पर्यंत)

येथे उमेदवाराला                 या बटनावर क्लिक करुन परीक्षा शुल्काचे चलान प्रिंट करता येईल. चलान प्रिंट केल्यावर उमेदवाराने   या बटनावर क्लिक करुन लॉग आउट करावे.
उमेदवाराचा लॉग इन आयडी व पासवर्ड, चलान मधे उमेदवाराच्या प्रती (Candidate Copy) च्या खालील बाजूस उमेदवाराच्या सोयी करीता प्रिंट केलेला दिसेल.

 

 

टप्पा ब

महत्वाची सूचना – अर्ज सबमीट केल्यानंतर चलानवर दिलेल्या सूचनेनूसार बँकेत चलानद्वारे पैसे भरता येतील. (बॅंकेचे सुटीचे दिवस वगळून परंतू चलान बँकेत भरण्याच्या अंतिम दिनांका पर्यंत)

प्रिंट झालेल्या अधिकृत चलनाद्वारेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेत रोखीने परीक्षा शुल्क भरावे व चलनाच्या तीनही प्रतींवर बँकेकडून Journal Number (Transaction ID) ची नोंद झाल्याची खात्री बँकेतच करुन घ्यावी.

 

माजी सैनिकांना परिक्षा शुल्क माफ असले कारणाने त्यांच्या अर्जासोबत परीक्षा शुल्क चालान छापले जाणार नाही व त्यांना हा टप्पा लागू नाही. परंतु, लेखनिक मागणी केल्यास हा टप्पा लागू राहील.

 
 

परीक्षा शुल्क नोंदीची स्थिती तपासा

उमेदवाराने बँकेत परीक्षा शुल्क भरल्यावर दोन दिवसांनी पुन्हा संकेतस्थळावर जाउन, येथे उमेदवाराने परीक्षा शुल्क नोंदीची स्थिती या बटनावर क्लिक करुन लॉग इन करावे व परीक्षा शुल्क नोंदीची स्थिती तपासून घ्यावी.